ताजी बातमी ऑनलाईन टीम
शहरातील विश्रामबाग परिसरात असणाऱ्या १०० फुटी रोडवरील
रविवार बझार मध्ये खरेदीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल
अज्ञात चोरटयांनी गर्दीचा फायदा उचलत हातोहात लंपास केला. सदर चोरीची घटना ही रविवार ता. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
या प्रकरणी महेश नाभिराज आष्टेकर (वय ५२ रा. कुपवाड रोड, विश्रामबाग) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी अष्टेकर यांचा २० हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला.