Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात आत्महत्यांचे सत्र सुरुच; एकाच दिवसात विशीतील तरुणासह तिघांनी आयुष्य संपवलं

कोल्हापुरात आत्महत्यांचे सत्र सुरुच; एकाच दिवसात विशीतील तरुणासह तिघांनी आयुष्य संपवलं

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्यांचे सत्र सलग सुरुच आहे.यामध्ये तरुण आणि तरुणींच्या आत्महत्यांचे प्रमाण अत्यंत चिंताजनक आहे. रविवारी कोल्हापूर शहराच्या उपनगरामध्ये एकाच दिवसात तिघांनी आत्महत्या केली. पाचगाव, मोरेवाडी आणि नागावमध्ये आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत.

आर. के. नगरमधील दीपक करमचंद रयत (वय 50, गणेश नगर, रुमाले माळ) यांनी राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली. त्यांच्या मागे तीन भाऊ, बहीण असा परिवार आहे. आत्महत्येची दुसरी घटना मोरेवाडीत घडली. तेजस प्रशांत यादव (वय 19, रा. म्हाडा कॉलनी) या तरुणाने राहत्या घरी साडीने गळफास घेत आत्महत्या केली. तेजस हा महाविद्यालयीन विद्यार्थी होता. त्याच्या मागे आई, वडील, बहिण असा परिवार आहे. तिसरी घटना हातकणंगले तालुक्यातील नागावात घडली. नुरमहमंद साहेबजी मुल्लाणी (वय 42) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. या आत्महत्यांची नोंद करवीर आणि हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -