‘बिग बॉस मराठी २’ चा विजेता शिव ठाकरे सध्या हिंदी बिग बॉस देखील गाजवतोय.त्यांच्या वागण्याने त्याने हिंदी प्रेक्षकांचे आणि अगदी सलमान खानचेही मन जिंकले आहे. इतकंच नाही तर त्याला थेट सलमान खानच्या चित्रपटात काम करण्याची लॉटरी लागल्याची चर्चा आहे. होय शिव ठाकरे लवकरच सलमानच्या आगामी बिग बजेट सिनेमात दिसू शकतो.
टेलिचक्कर या माध्यम रिपोर्टनुसार शिव ठाकरेला सलमानच्या चित्रपटाची ऑफर आली आहे. अद्याप शिव बिग बॉसच्या घरात असल्याने त्याच्याकडून अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र सलमानचे दोन आगामी सिनेमे ‘टायगर ३’ आणि ‘किसी का भाई किसी की जान ‘ यापैकी एखाद्या सिनेमात शिव मराठमोळ्या शिव ठाकरेची भूमिका असेल अशी शक्यता आहे. बिग बॉसचाच आणखी एक स्पर्धक अब्दू रोझिक यापूर्वीच किसी का भाई किसी की जान मध्ये दिसणार हे समोर आले आहे. आता शिव लाही बिग बॉसमुळे लॉटरीच लागल्याचं दिसतंय.
शिव ठाकरेने त्याच्या स्वभावामुळे सर्वांचेच मन जिंकले आहे. बिग बॉसच्या घरात साजिद खान, एमसी स्क्वेअर, अब्दू रोझिक यांच्याबरोबरची त्याची मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. शिवची खेळण्याची स्टाईलही जबरदस्त आहे म्हणूनच तो अजूनही घरात टिकून आहे. बिग बॉस हिंदीमध्येही तो टॉप ३ पर्यंत मजल मारतो की काय अशीच त्याची अप्रतिम खेळी आहे. तसेच त्याला हिंदी सिनेमात बघण्यासाठीही चाहते उत्सुक आहेत.