खतरों के खिलाडी या धोकादायक स्टंटने भरलेल्या रिॲलिटी शोचा १३ वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. धोकादायक स्टंटने भरलेल्या या खेळाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. खतरों के खिलाडीच्या यंदाच्या १३ व्या सिझनमध्ये शिव ठाकरे आणि प्रियंका चहर चौधरी सहभाग होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यांच्यानंतर आता या शोमध्ये सहभागी होण्यासाठी आता रॅपर एमसी स्टॅनच्या नावाची चर्चा सुरु आहे.
यावेळी शोमध्ये रॅपर एमसी स्टॅन देखील दिसणार आहे. शोच्या निर्मात्यांनी त्याला ऑफर दिल्याचे माहिती आहे, परंतु त्याने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. सध्या तो देशभरात त्याच्या कॉन्सर्टमध्ये व्यस्त आहे. बिग बॉसचा १६ ला सीझन जिंकल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. जर एमसी ने खतरों के खिलाडीच्या नव्या सीझनमध्ये भाग घेतला तर या शो चा टीआरपी गगनाला भिडू शकतो.
खतरों के खिलाडीच्या १३वा सीझनचे शूटिंग केपटाऊनऐवजी अर्जेंटिनामध्ये होणार आहे. जिथे सीझन ७ आणि सीझन ९ चे शूटिंग आधीच झाले आहे. तसेच यामध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धक मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात अर्जेंटिनामध्ये जाऊ शकतात. पण यंदाच्या सीझनमध्ये नेमके कोणते स्पर्धेक पहायला मिळतील याबाबत उत्सुक्तता लागली आहे.
खतरों के खिलाडीच्या नव्या सीझनचे हे असतील स्पर्धेक
नुकतीच बातमी आली होती की नागिन ६ फेम सिंबा नागपाल देखील यावेळी खतरों के खिलाडीचा भाग असणार आहे. अद्याप तिच्या नावाची पुष्टी झालेली नाही. बिग बॉस १६ फेम शिव ठाकरे, अर्चना गौतम, सौंदर्या शर्मा, प्रियांका चहर चौधरी, लॉक अप १ विजेता मुनावर फारुकी आणि अंजली अरोरा यंदाच्या खतरों कें खिलाडीच्या नव्या सीझनचे स्पर्धेक असणार आहेत.
अब्दूशी मैत्री तुटल्यानंतर ‘खतरों के खिलाडी’मध्ये एमसी स्टॅनची एंट्री? ‘या’ स्पर्धकांना देणार टक्कर
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -