बंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअवर आरसीबी आणि कोलकाता यांच्यामध्ये काटें की टक्कर होत आहे. नीतीश राणाच्या नेतृत्वातील कोलकाता संघ आठव्या क्रमांकावर आहे. कोलकात्याला पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी कोलकात्याला विजय गरजेचा आहे. दुसरीकडे आरसीबीचा संघ विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. त्याशिवाय ईडन गार्डन्सच्या मैदानावरील पराभवाचा वचपा काढण्यासाठी आरसीबी आपल्या घरच्या मैदानावर उतरेल. हेड टू हेड आणि चिन्नास्वामी मैदानाची खेळपट्टी कशी आहे… त्याशिवाय प्लेईंग 11 कशी असेल..यासंदर्भात जाणून घेऊयात.
कोलकाता आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत काटें की टक्कर पाहायला मिळाली आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये केकेआरने आरसीबीचा दारुण पराभव केला होता. कोलकात्याच्या फिरकी गोलंदाजांपुढे आरसीबीची फलंदाजी ढेपाळली होती. हा सामना कोलकात्याने जिंकला होता. पण आता बेंगलोरच्या मैदानावर आरसीबी पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
आयपीएलमध्ये कोलकाता आणि आरसीबी यांच्यात आतापर्यंत 31 सामने झाले आहेत. यामध्ये कोलकाता संगाचे पारडे थोडे जड दिसतेय. कोलकाता संघाने आतापर्यंत 17 सामन्यात बाजी मारली आहे. तर आरसीबीने संघाने 14 सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघ विजयासाठी आज मैदानात उतरणार आहेत.
आज संध्याकाळी 7.30 वाजता बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना रंगणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आहे. येथे गोलंदाजांना खास कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरूमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा करूनच फलंदाजांवर दबाव आणता येतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा होतो, असे आकडेवारीवरुन दिसतेय.
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग ‘जिओ सिनेमा’ ॲपवर उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
कोलकाता नाइट रायडर्स : जेसन रॉय, लिटन दास (विकेटकीपर), एन जगदीशन, वेंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती
रॉयल चेंलेंजर्स बेंगलोर : फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेशाई, हर्षल पटेल, जोश हेजलवूड, वानिंदु हसारंगा, मोहम्मद सिराज