Friday, February 7, 2025
Homeक्रीडाकोलकाता आणि पंजाब आमने-सामने! कोलकाता पराभवाचा वचपा काढणार?

कोलकाता आणि पंजाब आमने-सामने! कोलकाता पराभवाचा वचपा काढणार?

इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 53 व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ आमने-सामने येणार आहे. सोमवारी, 8 मे रोजी हा सामना खेळवला जाणार आहे. कोलकाताच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. ईन गार्डन्स मैदानावर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना पाहायला मिळेल.

पंजाब किंग्सने यंदाच्या हंगामातील त्यांच्या 10 सामन्यांपैकी पाच सामन्यांत विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने 10 सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत. कोलकाता संघ मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून आजच्या सामन्यात उतरणार आहे. विजयी कामगिरी कायम राखण्याचा संघाचा प्रयत्न असेल. 

आयपीएल 2023 मधील दुसऱ्या सामन्यात पंजाब आणि कोलकाता संघांमध्ये लढत पाहायला मिळाली होती. या सामन्यात कोलकातावर पंजाबने सात धावांनी विजय मिळवला. आयपीएल गुणतालिकेत पंजाब किंग्स सातव्या तर कोलकाता नाईट रायडर्स आठव्या क्रमांकावर आहे. पंजाब संघाकडे 10 गुण तर कोलकाता संघाकडे 8 गुण आहेत. दोन्गी संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.

आज पंजाब आणि कोलकाता यांच्यातील सामना कोलकाताच्या घरच्या ईडन गार्डन मैदानावर पार पडणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या स्टेडियमच्या लहान आकारामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान, या मैदानावर दव महत्त्वाची भूमिका बजावते. दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळू लागते, त्यानंतर धावा काढणं कठीण होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -