Friday, February 7, 2025
Homeक्रीडाGT vs CSK Qualifier 1 Head to Head : गुजरात टायटन्स विरुद्ध...

GT vs CSK Qualifier 1 Head to Head : गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दोघांपैकी वरचढ कोण?


आयपीएल 16 व्या मोसमातील साखळी फेरीतील थरार संपल्यानंतर आता प्लेऑफची रंगत क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या प्लेऑफ फेरीला मंगळवारी 23 मे पासून सुरुवात होणार आहे. या प्लेऑफला क्वालिफायर 1 ने सुरुवात होणार आहे. या क्वालिफायर 1 मध्ये गतविजेता  गुजरात टायटन्स विरुद्ध  चेन्नई सुपर किंग्स यांच्यात चढाओढ पाहायला मिळणार आहे. गुजरातने 2022 मध्ये पदार्पणातच आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तर चेन्नईने एकूण 4 वेळा चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

क्वालिफायर 1 मध्ये जिंकणारी टीम थेट फायनलमध्ये पोहचेल. तर पराभूत होणारी टीम क्वालिफायर 2 मध्ये एलिमिनेटर जिंकणाऱ्या संघांविरुद्ध खेळेल. मात्र त्याआधी गुजरात विरुद्ध चेन्नई या दोघांपैकी वरचढ कोण आहे, हे आपण जाणून घेऊयात.

आकड्यांवर विश्वास बसणार नाही

गुजरात विरुद्ध चेन्नई हे दोन्ही संघांनी आतापर्यंत एकूण 3 वेळा आमनासामना केला आहे. यामध्ये गुजरातने चेन्नईला लोळवलंय. गुजरातने चेन्नई विरुद्ध खेळलेल्या तिन्हीच्या तिन्ही सामन्यात चेन्नईला घाम फोडलाय. त्यामुळे किमान आकडे गुजरातच्या बाजूने आहेत. मात्र हा सामना चेन्नईच्या होम ग्राउंड अर्थात एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये आहे. त्यामुळे कधी काहीही होऊ शकतं.

गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.

चेन्नई सुपर किंग्स टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -