Friday, December 27, 2024
Homeब्रेकिंगआर्थिक गुन्हे शाखेच्या पथकावर काळाचा घाला, जळगावात मन हेलावणारी घटना

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकावर काळाचा घाला, जळगावात मन हेलावणारी घटना

ताजी बातमी ऑनलाईन टीम

जळगावतून एक मोठी बातमी समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत सहायक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली. संबंधित घटनेमुळे जळगाव पोलीस दलात खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही जळगावच्या अंजनी धरणाजवळ घडली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचं हे पथक जळगावहुन एरंडोल-कासोदाकडे एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी होतं. पण रस्त्याने जात असताना अचानक त्यांच्या चालत्या गाडीवर झाड कोसळलं. या घटनेमुळे स्थानिक नागरीकदेखील सुन्न झाले आहेत.

संबंधित घटना ही गुरुवारी रात्री पावणे 9 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झालाय. तर इतर तीन कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची घटना समोर आल्यानंतर कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले. अंजनी धरणालगत ही दुर्घटना घडली आहे. स्थानिकांकडून या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघातात गाडीमधील इतर तीन कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले.अंजनी धरणालगत ही दुर्घटना घडली आहे.

या अपघातात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी हे दोन्ही जागेवरच ठार झाले आहेत. तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक पिलखोड येथील एका प्रकरणाच्या तपासासाठी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -