Saturday, August 2, 2025
Homeब्रेकिंगसरकारी अनुदानाचा फायदा घेऊ घरावर बसवा ‘हा’ सोलर पॅनल अन मिळवा 25...

सरकारी अनुदानाचा फायदा घेऊ घरावर बसवा ‘हा’ सोलर पॅनल अन मिळवा 25 वर्ष वीजबिल भरण्यापासून मुक्तता

Solar Panel:-महागाईचा भस्मासुर जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रात डोकावत असून सर्वसामान्य नागरिकांना याच्या खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक झळा सोसाव्या लागतात. महागाई ही जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत तर वाढलेली आहेच परंतु दैनंदिन वापरातल्या महत्त्वाच्या बाबी म्हणजे पेट्रोल, डिझेल तसेच स्वयंपाकाचा गॅस आणि विजेचे दर हे देखील वाढलेले आहेत. यामध्ये जर आपण वीज बिलांचा विचार केला तर बऱ्याचदा नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिलांचा भार सहन करावा लागतो.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे बऱ्याचदा विजेचा लपंडाव त्यामुळे देखील नागरिक त्रस्त असतात. या दृष्टिकोनातून विचार केला तर सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन मिळावे याकरिता आता सरकार देखील विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करत आहे. याच अनुषंगाने आपण या लेखांमध्ये घराच्या छतावर सौर पॅनल बसवल्यामुळे काय फायदा होऊ शकतो? आणि त्याला येणारा खर्च इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.घराच्या छतावर बसवा हा सोलर पॅनल

तुम्ही जर घराच्या छतावर दोन किलो वॅटचा सोलर पॅनल बसवला तर साधारणपणे एक लाख दहा हजार रुपये त्याला खर्च येतो. परंतु महत्त्वाची बाब म्हणजे या एकूण खर्चाच्या 40% सबसिडीच्या माध्यमातून सरकारकडून ग्राहकाला दिले जाते. म्हणजेच दोन किलोवॅटचा सोलर पॅनल 72 हजार रुपयांमध्ये आपण घराच्या छतावर बसवू शकतो. एकदा बहात्तर हजार रुपये खर्च केल्यानंतर मात्र 25 वर्षापर्यंत विज बिल भरण्यापासून कायमचे मुक्तता मिळते.

जर आपण या दोन किलो वॅटच्या सोलर पॅनलचे फायदे पाहिले तर दहा तासांमध्ये दहा युनिट वीज निर्मिती या पॅनलच्या माध्यमातून आपण करू शकतो. या हिशोबाने जर एका महिन्याचा विचार केला तर साधारणपणे 300 युनिट वीज निर्मिती होते. आपल्या घराला जर शंभर युनिट वीज प्रति महिन्याला लागत असेल तर उरलेली विज विकून आपण आर्थिक प्राप्ती देखील करू शकतोदुसरे महत्त्वाचे म्हणजे या सोलर पॅनलचा मेंटेनन्स खर्च खूप कमी आणि तो परवडणारा देखील आहे. यामध्ये मेंटेनन्सचा विचार केला तर दहा वर्षानंतर एकदा वीस हजार रुपयाची बॅटरी बदलावी लागते. या दोन किलो वॅटच्या सोलर पासून घराची विजेची गरज तर भागतेच. परंतु अतिरिक्त उरणारी वीज सरकारला किंवा एखाद्या खाजगी कंपनीला विकून त्यातून पैसा मिळवता येतो.

परंतु त्याकरिता आरएडीएशी संपर्क करणे गरजेचे असते. राज्याची राजधानी तसेच प्रमुख शहरांमध्ये यांची कार्यालय आहेत.यामध्ये मोनोपार्क बाय फेशियल सोलर पॅनल हे नवीन तंत्रज्ञानाचे पॅनल असून या पॅनलच्या मागच्या व पुढच्या दोन्ही बाजूंनी वीज तयार होते. त्यामुळे दोन किलो वॅट साठी चार सोलर पॅनल पुरेसे ठरतात. या सोलर पॅनल उभारणी करता अनुदानासाठी सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची सोलर रुफटॉफ योजना महत्त्वाची आहे.मिळणाऱ्या अनुदानाचे स्वरूप

याकरिता सरकारी अनुदान मिळवायचे असेल तर डिस्कॉम पॅनल मधील कोणताही ठेकेदाराची निवड करून त्याच्याकडून हे सोलर पॅनल बसवावे लागते. या योजनेअंतर्गत तीन किलो वॅट पर्यंत सोलर पॅनल बसवले तर सरकारकडून 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. दहा किलो वॅट क्षमतेचा सोलर पॅनल बसवला तर 20 टक्के अनुदान व साधारणपणे एक किलो वॅट साठी 14300 सबसिडी दिली जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -