ताजी बातमी ऑनलाईन टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना शिंदे गटात धुसफूस सुरु झाल्याची बातमी समोर आली होती. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे त्यांच्या गटाकडे सर्व महत्त्वाची खाती जातील, अशी चर्चा शिंदे गटात होती. तसेच अजित पवार यांना अर्थ खातं दिली जाणार असल्याची चर्चा आहे. पण अर्थ खात्याला शिंदे गटाकडून विरोध होत असल्याची देखील बातमी समोर आली होती. या सगळ्या घडामोडींनंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या लंच डिप्लमसीनंतर आता बैठक सुरू आहे. या बैठकीत मराठा चेहरा म्हणून 2024 च्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्याच नेतृत्वात निवडणूक व्हावी असा नेत्यांचा सूर आहे. अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी कसं बसवायचं? यावर चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनीदेखील आज आपल्या भाषणात आपल्याला राज्याचं मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. आपण पाचवेळा राज्याचा उपमुख्यमंत्री बनलो. पण त्यापुढे गाडी जात नाहीय, अशी खंत त्यांनी आज व्यक्त केली. त्यानंतर आता पडद्यामागे घडामोडी घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा बॉम्ब, अजित पवार शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम करणार?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -