Home ब्रेकिंग मुसळधार पावसामुळे ३५ शेतकरी पुरात अडकले; प्रशासनाने हुशारी दाखवत सर्वांचा जीव वाचवला

मुसळधार पावसामुळे ३५ शेतकरी पुरात अडकले; प्रशासनाने हुशारी दाखवत सर्वांचा जीव वाचवला

0
मुसळधार पावसामुळे ३५ शेतकरी पुरात अडकले; प्रशासनाने हुशारी दाखवत सर्वांचा जीव वाचवला

ताजी बातमी ऑनलाईन टीम

जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पावसाला सुरूवात झाली आहे. बुधवारी रात्री ते गुरूवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २४.३० मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पाळा गावातील नाल्याला पूर आल्याने शेतात कामासाठी गेलेले ३५ शेतकरी पुरात अडकले होते. यावेळी पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला जेसीबीची मदत घ्यावी लागली. जेसीबीच्या साह्याने सर्व शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तहसील प्रशासनाने स्वतः यात लक्ष घालून लोकांचा जीव वाचवला.

मुखेड तालुक्यातील काही दुकानात शिरले पाणीमुखेड तालुक्यातील पाळा येथे रात्री अंदाजे ८च्या सुमारास मुसळधार पाऊस पडल्याने गावालगत असलेल्या नाल्याला पुर आला. शेतात कामाला गेलेल्या नागरीकांना पुर आल्याने गावात येता येत नव्हते. यामुळे जेसीबीच्या सहाय्याने रात्री नाल्यापलीकडील ३५ नागरीकांना सुखरुप गावाकडे आणण्यात आले. या घटनेकडे तहसिलदार राजेश जाधव हे विशेष लक्ष देऊन नागरीकांच्या संपर्कात होते. तर गावातही काही दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. ६ जुलै रोजी तलाठी, ग्रामसेवक हे पंचनामा करीत आहेत. आठ मंडळात अतिवृष्टीनांदेड शहर आणि परिसरात बुधवारी रात्री सर्वच तालुक्यात ब-यापैकी पाऊस झाला.

जिल्ह्यातील अदमपूर, मुखेड, जांब, येवती, जेऊर, चांडोळा, आंबुलगा, माळाकोळी या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. दरम्यान, गुरूवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास पावसाचा शिडकावा झाला. जूनपासून आत्तापर्यंत ४७.१६ टक्के पाऊस जूनपासून ते आत्तापर्यंत सरासरीच्या ४७.१६ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. धरणसाठ्याची स्थिती जैसे थे आहे. तर खरिपातील पेरण्यांचे कामही रखडले आहे. काही शेतकऱ्यांनी पाऊस पडेल, या आशेवर पेरण्यांची कामे आटोपून घेतली. परंतू पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्यामुळे त्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामान आणि वादळी वाऱ्यासह काही भागात कमी अधिक पाऊस पडल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांचा आशा पल्लवीत झाल्या आहेत.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here