इचलकरंजी तिघा चोरट्यांकडून घरफोडीचा गुन्हा उघड

ताजी बातमी ऑनलाईन टीम

इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलिस गस्त घालताना मिळून आलेल्या तिघा संशयीतांकडे कसून चौकशी केली असता दुचाकी आणि मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला. महेंद्र ठाकुर, हजरू बघेल आणि कालु डावर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून हुपरीतील मोबाईल आणि दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

शनिवारी शिवाजीनगर पोलिस रात्र गस्त घालत असताना रांगोळी गावातील बसस्थानक परिसरात पोहचले. यावेळी तिघा दुचाकीस्वारांनी पोलिसांची चाहुल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन महेंद्र ठाकूर याला ऊसाच्या शेतातून पकडले. त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने कालु डावर आणि हजरु बघेल हे दोघे रांगोळीतील प्लायवुड कारखान्यात असल्याचे सांगितले. त्या दोघांना ताब्यात घेतले असता दुचाकी चोरीची आणि हुपरी पोलिस ठाण्यासमोरील मोबाईल शॉपीतून २मोबाईल चोरल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक रोहन पाटील, सागर – चौगुले, आसिफ मुलाणी, सुनिल बाईत, गजानन बरगाले, सतीष कुंभार सहभागी झाले होते.

Open chat
Join our WhatsApp group