ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्गातील पात्र कुटुंबांसाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड यादी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत करावी, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकरी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केली आहे.राज्य शासनाचे ‘सर्वांसाठी घरे-२०२४’ हे धोरण आहे. त्यानुसार राज्यातील बेघर, तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना २०२४ पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळावे, असा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत.
२०११ च्या सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणात प्राधान्यक्रम यादीत ज्या कुटुंबांचा समावेश नव्हता, अशा पात्र कटुंबासाठी ‘आवास प्लस’ (प्रपत्र-३) सर्वेक्षण करण्यात आले. मात्र या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या यादीत राज्यातील मोठ्या प्रमाणावर पात्र लाभार्थ्यांची नावे विविध कारणांमुळे अंतर्भूत होऊ शकली नाहीत.
इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांसाठी कोणतीही योजना नव्हती. त्यामुळे २०२३-२४ या वर्षापासून महाराष्ट्र शासनाने इतर मागास प्रवर्गासाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू केली आहे. १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी उपस्थित राहून मोदी आवास योजनेसाठी गरजू लाभार्थ्यांची नावे सूचित करावीत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी केले आहे.
‘ओबीसी’साठी मोदी ग्रामीण आवास घरकुल योजना
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -