ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरुन सध्याचं राजकारण ढवळून निघालंय. एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद जाणार आणि ती खुर्ची अजित पवारांना मिळणार अशीच जोरदार चर्चा सध्य़ा राजकारणात सुरु आहे. मात्र या चर्चेत आता नवा ट्विस्ट आलाय. शरद पवारांना सोबत आणल्याशिवाय अजित पवारांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार नसल्याचा गौप्यस्फोट दुसरा तिसरा कुणी नव्हे तर मविआतली घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनीच केलाय. आणि त्यामुळेच अजित पवारांनी पुण्यात शरद पवारांची गुप्त भेट घेतल्याचा दावा वडेट्टीवारांनी केलाय.
मात्र वडेट्टीवारांचा हा दावा मविआतीलच दुसरा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटानं फेटाळून लावलाय. मुंबईतही अजित पवार गटाने दोनदा शरद पवारांशी भेट घेतली होती. तेव्हाही शरद पवार भाजपसोबत जाण्याच्या वावड्या उठल्या. मात्र राष्ट्रवादीबाबत संभ्रम निर्माण होण्यासाठीच अशा गोष्टी पेरल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. मात्र या सर्व घडामोडींमुळे ठाकरे गट मात्र चिंतेत सापडलाय.. जर पवारांनीच साथ सोडली तर ठाकरे गटाचं काय होणार असा सवाल विचारला जातोय..
दुसरीकडे शरद पवारांना केंद्रात कृषिमंत्रीपद आणि निती आयोगाचं अध्यक्षपद देऊ केल्याचा दावा माजी मुख्यमंत्र्यांनी केलाय. तसंच खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनाही मंत्रिपदाची ऑफर असल्याचाही दावा करण्यात आलाय. अजित पवार म्हणूनच वारंवार शरद पवारांकडे भाजपसोबत चला म्हणून याचना करत असल्याचं बोललं जातंय.. तेव्हा अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाची दोरी सध्या तरी शरद पवारांच्याच हातात असल्याचं दिसतंय….मात्र पवार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगतायत,.
शरद पवारांच्या हातात मुख्यमंत्रिपदाची दोरी, राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -