राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) कोल्हापुरात असूनही आपल्याला त्यांची भेट घेता येत नाही, असे सांगतानाच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री प्रसारमाध्यमांशी बोलताना भावनाविवश झाले. गेल्या ४० वर्षांत हे प्रथमच घडत असल्याचे सांगतानाच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काल दसरा चौकात सभा झाली. याबाबत शासकीय विश्रामगृहावर थांबून असलेल्या मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना विचारले असता ते म्हणाले, ‘गेल्या ४० वर्षांत श्री. पवार कोल्हापुरात आलेत आणि मी त्यांच्यासोबत नाही असे कधीच झाले नाही. मात्र, आज त्यांची भेट होत नाही. परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेतलेला आहे.हा निर्णय का घ्यावा लागला हे त्याचे विवेचन आम्ही केलेले आहे. आज ते कोल्हापुरात येत असताना आम्ही त्यांच्यासोबत नाही याचे दुःख होते. काही निर्णय आम्ही घेतले असले तरी श्री. पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये आहे हेच खरे आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -