आशियाई क्रिकेट करंडकाला येत्या ३० ऑगस्टपासून पाकिस्तानात सुरुवात होणार आहे. पाकिस्तान-नेपाळ यांच्यामधील लढतीने या स्पर्धेतील लढतीचा श्रीगणेशा होईल, पण भारत- पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दोन सप्टेंबरला या क्रिकेटमधील दोन बलाढ्य देशांमध्ये लढतीचा थरार रंगणार आहे; मात्र जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. कँडी येथील पाल्लेकेले येथे दोन सप्टेंबर रोजी पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
ॲक्यू वेदर डॉट कॉम या संकेतस्थळावर दोन सप्टेंबरला कँडी येथे ७० टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यामधील लढत भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. कँडी येथे सकाळी ५५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुपारी ७० टक्के पाऊस पडणार आहे; मात्र संध्याकाळी पावसाची शक्यता कमी प्रमाणात आहे. त्यामुळे संध्याकाळी दोन देशांमधील लढत पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. पावसामुळे ही लढत खेळवण्यात आली नाही, तर या स्पर्धेमध्ये राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.
तीन वेळा आमने-सामने येणार?भारत-पाकिस्तानमध्ये आशियाई करंडकामध्ये तीन वेळा लढत होण्याची दाट शक्यता आहे. दोन देश सुरुवातीला साखळी फेरीत एकमेकांसमोर येतील. त्यानंतर सुपर फोरमध्ये पुन्हा दोन देशांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. तसेच अंतिम फेरीत पोहोचल्यास दोन्ही देश तिसऱ्यांदा आमने-सामने येतील.
उत्सुकता शिगेला मात्र भारत-पाकिस्तान सामना रद्द? मोठे कारण आले समोर
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -