Sunday, December 22, 2024
Homeसांगली5लिफ्टच्या बहाण्याने लुबाडणारे जेरबंद

5लिफ्टच्या बहाण्याने लुबाडणारे जेरबंद



पतीचा अपघात झालाय, लिफ्ट द्या,’ अशी बतावणी करून लुबाडण्याचे प्रकार महानगरात सामान्य आहेत. आता त्याचे लोण सांगलीतही आल्याचे चित्र आहे. अशाच पद्धतीने येथील बायपास पुलाजवळ भरदुपारी तरुणास बतावणी करून लुबाडण्यात आले.एका महिलेने पतीचा अपघात झाल्याची बतावणी करून लिफ्ट मागितली होती. त्यानंतर काही अंतरावर तिच्या दोन साथीदारांनी वाद घालत संबंधित तरुणाला लुबाडले.

गॅरेजमध्ये कामास असलेल्या यश धनंजय मगदूम (कसबे डिग्रज) याने फिर्याद दिली. शहर पोलिसांनी तिची गांभीर्याने दखल घेतली. यशला लुबाडणाऱ्या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी अवघ्या २४ तासात आवळल्या. सोहेल राजेसाब गलगले (वय २४, अभिनंदन कॉलनी, बिरनाळे शाळेजवळ, सांगली), आसिफ अजमुद्दीन शेख (वय २५, राजूनगर, संजयनगर, सांगली) अशी त्या दोघांची नावे आहेत. संशयित महिलेचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की यश मगदूम काल गॅरेजमधून घरी जात असताना बायपास पुलाजवळ बुरखा घातलेल्या एका महिलेने त्याला थांबविले. पतीचा अपघात झाल्याचे सांगत सांगलीवाडी टोलनाक्यापर्यंत सोडण्याची विनंती केली. ती जबरदस्तीने यशच्या दुचाकीवर बसली. तेथून जवळच असलेल्या एका पेट्रोलपंपाजवळ गेल्यानंतर महिलेसह वरील संशयितांनी वादावादी करत यशकडून मोबाईल काढून घेतला.भरदिवसा घडलेल्या घटनेचा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पथकाला माहिती मिळाल्यानंतर संशयिताच्या घराजवळ सापळा लावून त्यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, गुंडोपंत दोरकर, संतोष गळवे, गौतम कांबळे, सचिन शिंदे, गणेश कांबळे आदींच्या पथकाने कारवाई केली.

लिफ्टचा बहाणा करून लुबाडण्याची घटना समोर आली आहे. वाहनचालकांनी सावध राहावे. असे कोठे निदर्शनास आल्यास त्वरित संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -