Friday, January 16, 2026
Homeसांगलीसांगली : चालकाचा ताबा सुटल्याने मोटार शेडमध्ये घुसली, पोलीस अधिकारी जखमी

सांगली : चालकाचा ताबा सुटल्याने मोटार शेडमध्ये घुसली, पोलीस अधिकारी जखमी

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अंकली फाट्याजवळ मध्यरात्री चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात बंदोबस्तासाठी असलेले एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले. मोटारचालकाला किरकोळ दुखापत झाली.मोटार रस्ता सोडून रस्त्याकडील शेडमध्ये घुसली.मिरजेहून कोल्हापूरला निघालेल्या मोटारीला अंकली फाटा येथे अपघात झाला. मोटारीमधील आपत्कालीन एअरबॅग उघडल्याने चालकाला किरकोळ इजा झाली. मात्र अमावस्येनिमित्त नाकाबंदीसाठी रस्त्याकडेला उभ्या असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातग्रस्त मोटार रस्त्याकडेच्या पत्र्याच्या शेडमध्यै घुसल्याने शेडचे नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -