कोल्हापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्यातील दहा उपनेत्यांमध्ये कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांची निवड झाली आहे. हे पद म्हणजे त्यांची पदोन्नतीच आहे. स्वाभिमानी शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे.गेली ३५ वर्षे ते शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते राहिले आहेत. पवार यांनी यापूर्वी करवीर तालुका प्रमुख, शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. पंधरा वर्षे ते कोल्हापूर महानगरपालिकेत नगरसेवक होते. राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची कट्टर शिवसैनिक म्हणून राज्यभर नवी ओळख निर्माण झाली.उपनेतेपद मिळाल्यामुळे आता त्यांच्या अधिकारात आणखी वाढ झाली आहे. विजय साळवी (कल्याण), संजय जाधव (परभणी), संजय पवार (कोल्हापूर), राजूल पटेल (मुंबई), शरद कोळी (सोलापूर), अस्मिता गायकवाड (सोलापूर), शुभांगी पाटील (नाशिक), जान्हवी सावंत (कोकण) आणि छाया शिंदे (सातारा) यांची उपनेतेपदी नियुक्ती झाली आहे.
शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्यावर ठाकरेंनी सोपवली मोठी जबाबदारी, पवारांची उपनेतेपदी केली निवड
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -