Sunday, July 6, 2025
Homeक्रीडाWorld Cup : सेंच्युरी झळकावूनही विराटला केलं इग्नोर? रोहित शर्माने 'या' खेळाडूला...

World Cup : सेंच्युरी झळकावूनही विराटला केलं इग्नोर? रोहित शर्माने ‘या’ खेळाडूला दिलं विजयाचं श्रेय

ताजी बातमी ऑनलाईन टीम


पुण्याच्या स्टेडियमध्ये वर्ल्डकपचा भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यातील सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने बांगलादेशाचा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्डकपमधील सलग चौथा सामना जिंकला आहे. यामुळे टीम इंडियाचे एकूण 8 पॉईंट्स झाले असून पॉईंट्स टेबलमध्ये दुसरं स्थान गाठलं आहे. या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं, मात्र टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने विराट सोडून या खेळाडूला विजयाचं श्रेय दिलं आहे.

टीम इंडियाने चौथा सामना जिंकला असून या सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ‘आमच्यासाठी हा एक मोठा विजय होता. आम्ही याची आतुरतेने वाट पाहत होतो. या सामन्यात आमची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र पण मधल्या आणि शेवटच्या ओव्हर्समध्ये टीमच्या खेळाडूंनी सामना आमच्याकडे खेचला. कोणत्या लेंथने गोलंदाजी करायची हे समजून घेण्यात आमचे गोलंदाज हुशार होते.

रविंद्र जडेजा गोलंदाजी आणि कॅच घेण्यात हुशार आहे, मात्र तुम्ही सेंच्युरीला हरवू शकत नाही. आम्ही एक ग्रुप म्हणून चांगली कामगिरी करतोय. हार्दिक पांड्याला थोड्या वेदना होतायत. मात्र काही मोठी गोष्ट नाहीये. संघातील प्रत्येकजण दबावातून जात असून चाहते मोठ्या संख्येने सामना पाहण्यासाठी उपस्थित राहतायत, असंही रोहितने सांगितलंय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -