Monday, February 16, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजी ; यंत्रमाग कामगारांच्या पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी स्वराज्य क्रांतीची निदर्शने

इचलकरंजी ; यंत्रमाग कामगारांच्या पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी स्वराज्य क्रांतीची निदर्शने

ताजी बातमी ऑनलाईन टीम
इचलकरंजी : वृद्ध यंत्रमाग कामगारांना शासनाने पेन्शन लागू करावी, कामगारांसाठी घरकूल योजना राबवावी यासह अन्य मागण्यांप्रश्री स्वराज्य क्रांती कामगार सेना पँथर आर्मीने प्रांत कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना दिले. कामगारांना आठवड्यातून एखादी साप्ताहिक सुट्टी, पगारी रजा मंजूर करावी यासाठी शासनाने कडक धोरण अवलंबावे, कामगार व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना शासनाने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना १० हजार रुपयांप्रमाणे मासिक वेतन जाहीर केले आहे. तसा शासन आदेश अंमलात आणला आहे जो पारित करावा, दि. १ ते १५ दरम्यान सुताचे दर ट्रेडींग कंपन्या, मिल चालक यांनी स्थिर ठेवावेत, यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलून शासन आदेश जारी करावा, कुणी त्याचा अवमान केला तर कायदेशीर कारवाई करावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. यावेळी संतोष आठवले, तानाजी शिंदे, त्रिंबक दातार, दगडू कांबळे, जयसिंग कांबळे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -