कोरोची येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका पानशॉप व्यावसायिकावर जीघेघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पंकज माने याने फारुख सनदी याच्या डोक्यात व हातावर दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी फारुक मुबारक संनदी (वय ३२, रा. कोरोची) यांचे कोरोची वैधील पाण्याच्या टाकीजवळ मुबारक पान शॉप नावाचे दुकान आहे. ८ रोजी रात्रीच्या सुमारास संशयित आरोपी पंकज सर्जेराव माने (रा. कोरोची) हा दुकानासमोर आला. त्याने फारुक सनदी यांच्याकडे पैशांची मागणी केली. फारुख बाने ७ हजार रुपयाची मागणी केली मात्र, रक्कम देण्यास स्पष्ट नकार दिल्याने पंकजने दगडाने फास्खला मारहाण केली. मारहाणीत फारुख बाचा उजवा हात फॅक्चर झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कांबळे करीत आहेत.
