Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरमराठ्यांचा आक्रोश : कोल्हापुरात खासदारांच्या गाडीसमोर झोपत केली घोषणाबाजी

मराठ्यांचा आक्रोश : कोल्हापुरात खासदारांच्या गाडीसमोर झोपत केली घोषणाबाजी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मराठा आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. राज्यभरात आंदोलने आणि उपोषणे करत वातावरण तापलं आहे.कोल्हापुरातही मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे.दरम्यान जलजीवनच्या कामाच्या उद्घाटनासाठी निघालेले खासदार संजय मंडलिक आणि आमदार राजेश पाटील यांच्या गाडीसमोर झोपत एका आंदोलकाने चक्क घोषणाबाजी केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात वाटंगी येथे रविवारी जलजीवन कामाचे उद्घाटन खासदार संजय मंडलिक आणि आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थित पार पडणार होते. या निमित्ताने दोघेही गावात आल्यानंतर मराठा समाज बांधवांनी गाडीसमोरच लोटांगण घालून त्यांची गाडी अडवली. यावेळी संतप्त आंदोलकाने एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची धांदल उडाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकाना बाजूला करण्याचा प्रयत्न केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -