ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजातर्फे रविवारी कोल्हापुरात ऐतिहासिक दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषणास प्रारंभ झाला. मराठा समाजाच्या सर्व संघटनेच्या नेत्यांनी क्रांतीची मशाल पेटवून या आंदोलनाचे रणशिंग फुंकले. विश्वासघात करणाऱ्या सरकारला इशारा दिला होता, परंतु यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा एल्गार मराठ्यांनी पुकारला आहे. या आंदोलनात मराठा समाजातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजातील सर्व संघटनांनी रविवारी सकाळी ९.३० वाजल्यापासून साखळी उपोषणास प्रारंभ केला. यासाठी घातलेल्या भव्य मंडपात मराठा समाजातील सर्व नेते आणि कार्यकर्ते उपोषणास बसले होते. आंदोलनास प्रारंभ करण्यापूर्वी नेत्यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घातला. क्रांतीची मशाल प्रज्वलित करुन साखळी उपोषणास प्रारंभ झाला.
वसंतराव मुळीक म्हणाले, मराठा आरक्षणाच्या क्रांतीची
मशाल पेटली आहे. मराठ्यांची घोडदौड सुरू झाली असून मराठ्यांचा गनिमी कावा शासनाला कळणार नाही. तातडीने आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अन्यथा हा वणवा पेटणार आहे.
ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, शासनाने वेळोवेळी समाजाचा विश्वासघात केला. शासनाचा निषेध म्हणून आम्ही मशाल पेटवली आहे. याची ठिणगी राज्यभर पसरल्याशिवाय राहणार नाही. या पेटत्या मशालीत शासनाची राखरांगोळी कधी होईल ते समजणार नाही. मराठ्यांना कोर्टामध्ये टिकणारे आरक्षण मिळवून देणार, शासनाने वेळेत जागे व्हावे असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्री अंधारातून आले आणि पळून गेले हा आरक्षणाचा वणवा पेटला आहे, असे ते म्हणाले.
आरक्षणासाठी मराठ्यांनी पेटवली मशाल; कोल्हापुरातून फुंकले रणशिंग
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -