Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरदेणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने हवे ते न्यावे; कोल्हापुरात उभी राहिली माणुसकीची भिंत

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने हवे ते न्यावे; कोल्हापुरात उभी राहिली माणुसकीची भिंत

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्यांने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे’… वि. दा. करंदीकर यांच्या या काव्यपंक्तीला साजेशा दातृत्वाची शनिवारी कोल्हापुरच्या सीपीआर चौकात प्रचिती आली. ‘नको असेल ते द्या हवे असेल ते घेवून जा’ हे ब्रीद वाक्य घेवून घेऊन सीपीआर चौकात शनिवारी (दि. ४) माणुसकीची भिंत उभी राहिली. जे नको आहेत असे असंख्य कपडे देण्यासाठी शेकडो दातृत्वांची रीघ लागली. याच दातृत्वातून हजारो गरजवंतांना ऐन दिवाळीच्या तोंडावर कपडे देऊन ही माणुसकीची भिंत अधिक मजबूत केली. शनिवारी सकाळी दहा वाजता आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गरजूंना कपडे वाटप करुन या उपक्रमाची सुरूवात झाली.

गोर-गरीबांची दिवाळी आनंदाने साजरी व्हावी, त्यांना किमान नवे-जुने वापरण्या योग्य कपडे मिळावेत, या उद्देशाने माणुसकीची भिंत हा उपक्रम गेल्या सात वर्षांपासून सुरु आहे. गरजूंना वापरता येतील, असे स्वच्छ कपडे सीपीआर चौकात आणून द्यावेत, तसेच गरजूंनी ते घेवून जावेत, असे आवाहन संयोजकांनी केले होते. या आवाहनला शेकडे नागरिकांनी प्रतिसाद दिला. सकाळी नऊ वाजल्यापासूनच सीपीआर चौकात उभारलेल्या मंडपात कपडे देण्यासाठी रीघ लागली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -