ताजी बातमी ऑनलाईन टीम
सागली : शहर व परिसरात आज, शनिवारी दुपारी मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. दिवाळीसाठी बाजार भरला असताना आलेल्या पावसाने विक्रेते व खरेदीदार नागरिकांची तारांबळ उडाली. किरकोळ विक्रेत्यांच्या मालाचे पावसाने नुकसान झाले.
सांगलीत सकाळपासून अंशतः ढगाळ वातावरण होते. दुपारी एक वाजता ढगांची दाटी होऊन शहराच्या उत्तर भागात म्हणजे वसंतदादा साखर कारखाना परिसरासह माधवनगरमध्ये पावसास सुरुवात झाली. त्यावेळी शहरात पावसाचा शिडकावा होता. दुपारी अडिच वाजता सांगली शहरात पावसाने हजेरी लावली. वीस मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. सांगलीच्या कापडपेठ परिसरात भरलेल्या शनिवारच्या आठवडा बाजारात तसेच शिवाजी मंडईत विक्रेते व खरेदीदार नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे रांगोळी व अन्य साहित्य भिजल्याने विक्रेत्यांचे नुकसान झाले.
सांगली शहरात पावसाची हजेरी, विक्रेत्यांची तारांबळ
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -