Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंग‘महिलांना पुरुषांची गरज असते कारण…’, नीना गुप्ता पुरुषांना असं काय म्हणाल्या ज्यामुळे…

‘महिलांना पुरुषांची गरज असते कारण…’, नीना गुप्ता पुरुषांना असं काय म्हणाल्या ज्यामुळे…

 

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी पुरुषांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, नीना गुप्ता यांनी स्त्री – पुरुष समानतेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. नीना गुप्ता यांनी स्त्री-पुरुष समान आहेत हा स्त्रीवादी सिद्धांत नाकारून.. मोठं सत्य समोर ठेवलं आहेत. महिलांना पुरुषांची गरज का असते आणि पुरुष मुल जन्माला घालू शकत नाहीत… याबद्दल नीना गुप्ता यांनी वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी एक उदाहरण देत स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नीना गुप्ता यांची चर्चा रंगली आहे.

नीना गुप्ता म्हणाल्या, ‘स्त्रीवादा सारख्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. ज्या महिला संपूर्ण घर सांभाळतात, त्यांनी स्वतःला कमी समजण्याची गरज नाही. कारण गृहिणी फार मोठी भूमिका बजावत आहेत. मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे पुरुष आणि महिला समान नाहीत..’

 

‘ज्या दिवशी पुरुष देखील गरोदर होतील, तेव्हा स्त्री-पुरुष समान आहेत असं मी म्हणेल. मला देखील पुरुषांची गरज आहे. एकदा मला 6 वाजता माझी फ्लाईट होती. तेव्हा माझा कोणी बॉयफ्रेंड नव्हता. फ्लाईटसाठी जेव्हा पहाटे 4 वाजता घरातून निघाली तेव्हा पूर्ण अंधार होता.. एक माणून माझा पाठलाग करु लागला. तेव्हा घाबरलेल्या अवस्थेत मी घरी गेली.’

 

पुढे नीना गुप्ता म्हणाल्या, ‘घडलेल्या घटनेनंतर मी दुसऱ्या दिवसासाठी तिकिट बूक केलं आणि एका मित्राच्या घरी थांबली. मित्र मला विमानतळापर्यंत सोडण्यासाठी आला… तेव्हा मला एका पुरुषाचं माझ्या आयुष्यात असलेलं महत्त्व कळलं. आता मला एक अशी व्यक्ती व्हायचं आहे जिला कोणाचीही गरज नाही.’ असं देखील नीना गुप्ता म्हणाल्या..

 

नीना गुप्ता कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. ‘पंचायत’ वेब सीरिज आणि ‘बधाई हो’ यांसारख्या सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. वयाच्या 63 व्या वर्षी देखील नीना गुप्ता चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. सोशल मीडियावर देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नीना गुप्ता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -