Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगएलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

 

LPG सिलिंडरच्या किमतीत या महिन्यातही पुन्हा वाढ झाली. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) शुक्रवार, 1 डिसेंबर रोजी व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किमती प्रति सिलेंडर 21 रुपयांनी वाढवल्या.वाढीनंतर, दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत 1,796.5 रुपये झाली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

 

गेल्या महिन्यातही व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 103 रुपयांनी वाढल्या होत्या. या वाढीनंतर हॉटेल, रेस्टॉरंट मालकांसह मिठाईवाल्यांना या गॅस दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. चला, जाणून घेऊया देशातील महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत काय आहे?

 

या दरवाढीनंतर, मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1,749 रुपये, चेन्नईमध्ये 1,968.5 रुपये आणि कोलकातामध्ये 1,908 रुपयांपर्यंत वाढेल. या ताज्या दरवाढीपूर्वी 16 नोव्हेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 57 रुपयांनी कपात करण्यात आली होती.

 

घरगुती सिलिंडरचे दर स्थिर

 

देशात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 1 डिसेंबर 2023 रोजीही त्यांच्या किमती बदलल्या नाहीत. याचा अर्थ राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 903 रुपये आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -