राशिभविष्य: शनिवार दि. 2 डिसेंबर 2023
जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:-
आध्यात्मिक प्रगती चांगली करता येईल. मनात नसत्या चिंता निर्माण होऊ शकतात. अति विचारात गुंतू नका. गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्यावे. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत.
वृषभ:-
नवीन मित्र जोडता येतील. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. स्वकष्टावर भर द्यावा. मनातील आकांक्षा पूर्ण होईल. काही नवीन खरेदी केली जाईल.
मिथुन:-
व्यवसायात चांगला लाभ मिळेल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. वडीलांकडून मदत घेता येईल. कमिशन मध्ये लाभ होईल. आज कामात फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत.
कर्क:-
आत्मविश्वासाने वागाल. दिवस मौजमजेत घालवाल. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. आवडत्या कामावर लक्ष द्या. मानसिक समाधान लाभेल.
सिंह:-
एखादी चांगली संधी चालून येईल. दानधर्म कराल. परदेशी गुंतवणुकीतून लाभ संभवतो. धार्मिक स्थळाला भेट देता येईल. आज उधार देणे टाळावे.
कन्या:-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. भागीदाराशी सलोखा वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.
तूळ:-
अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे. मनात अकारण भीती निर्माण होऊ शकते. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. परिस्थितीला नावे ठेऊ नका. उगाच चिडचिड करू नका.
वृश्चिक:-
मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. कष्ट न करता पैसे कमावण्याकडे कल राहील. आपले आवडते छंद जोपासा. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.
धनू:-
कौटुंबिक सौख्यात दिवस घालवाल. मानसिक समाधान लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मनातील चिंता दूर साराव्यात.
मकर:-
लहान प्रवास घडेल. कामात पत्नीची साथ मिळेल. भावंडांशी सुसंवाद साधला जाईल. मानसिक चांचल्य जाणवेल. कसलीही हार मानू नका.
कुंभ:-
कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे. चोरांपासून सावध राहावे. जामीनकीचे व्यवहार आज टाळावेत. फसवणुकीपासून सावधानता बाळगा. मामाकडून मदत घेता येईल.
मीन:-
मुलांच्या हुशारीने हुरळून जाल. त्यांचे कोडकौतुक कराल. दिवस आनंदात जाईल. प्रकृतीत सुधारणा होईल. शैक्षणिक प्रश्न सुटेल.