Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगकलंक लागलेला, दंगली भडकवणारा, वाया गेलेला छगन भुजबळ' मनोज जरांगेंचा हल्लाबोल

कलंक लागलेला, दंगली भडकवणारा, वाया गेलेला छगन भुजबळ’ मनोज जरांगेंचा हल्लाबोल

कलंक लागलेला मंत्री, दंगली भडकवणारा, वाया गेलेला म्हणजे छगन भुजबळ असा जोरदार हल्लाबोल करत मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भुजबळ राजद्रोहाचा प्रकार करतायत, असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर हल्ला चढवला. सभेच्या सुरुवातीपासूनच जरांगेंनी भुजबळांवर चौफेर टीका केली. त्याचवेळी भुजबळांच्या दबावात येऊन आरक्षण रोखाल तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय. तसंच 2 दिवसांत अंतरवालीमधले आणि एका महिन्यात महाराष्ट्रातले गुन्हे मागे घेण्याची मागणी जरांगेंनी केली. जालन्यात मनोज जरांगेंची सभा झाली. या सभेतून जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली. 17 डिसेंबरला अंतरवाली सराटीत मराठ्यांची बैठक होणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलंय.

 

छगन भुजबळ हे बुरसटलेल्या विचारांचा नकल्या आहेत, नकला करणं भुजबळांचा धंदाच आहे. ज्यांनी मोठे केलं त्यांनाच भुजबळांनी पायाखाली तुडवलं, अशी टीकाही जरांगेंनी भुजबळांवर केलीय..

 

जालन्यात जाहीर सभा

मनोज जरांगे पाटलांची जालना शहरात जाहीर सभा पार पडली. जरांगेंवर जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली . महाराष्ट्र दौऱ्याच्या चौथ्या टप्प्याला या सभेपासून सुरूवात होत असून, मराठवाडा, खान्देश, विदर्भ असा दौरा ते करणार आहेत..या सभेला लाखो मराठा समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती. जरांगेंचं व्यासपीठावर आगमन होताच गर्दीतल्या लोकांनी मोबाईलचा टॉर्च पेटवून त्यांचं स्वागत केलं

.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -