सांगली जिल्ह्यातील असलेल्या दोघांनी उत्तर प्रदेशातील कानपूरमधून गलाई व्यावसायिकांचे तब्बल 16 कोटींचे सोने घेऊन फरार झाले आहेत. सोन घेऊन जात असताना सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. कानपूर पोलिसांची एक टीम आरोपीच्या शोधासाठी सांगली जिल्ह्यात दाखल झाली आहे. दोघा संशयिताच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. कानपूर पोलिसांची टीम आरोपीच्या शोधासाठी सांगली जिल्ह्यात दाखल
आरोपी दोघेही मुळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. संपत शिवाजी लवटे व महेश विलास मस्के अशी या संशयितांची नावे असून पोलिसांनी त्यांचे फोटोही जारी केले आहेत. संपत हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बामणी गावचा आणि महेश हा पलूस तालुक्यातील नागराळे गावचा आहे. सांगली पोलिसांच्या मदतीने सोने घेऊन पळालेल्या दोघांचा शोध घेतला जात असून अद्याप दोघाचा थांगपत्ता लागला नाही. कानपूर पोलिसांची एक टीम आरोपीच्या शोधासाठी सांगली जिल्ह्यात दाखल झाली आहे. सध्या या दोघा संशयितांच्या कुटुंबातील सदस्यांची कानपूर पोलिस आणि स्थानिक पोलिस चौकशी करत आहेत.
सोने घेऊन जात असतानाचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. कानपूर पोलिसांनी याबाबत तातडीने तपास यंत्रणा लावली असून सांगली जिल्ह्यात तळ ठोकला आहे. विट्यातूनही याबाबतचा तपास सुरु असून चोरी करणारे संशयित आरोपी हे हे आरोपी फरार असल्याने कानपूर पोलिसांनी सांगली जिल्ह्यात आपली यंत्रणा लावली आहे.
बिहारच्या तुरुंगात बसून सांगलीत दरोडा
दुसरीकडे, सहा महिन्यापूर्वी पोलिसांना आव्हान देत सांगलीतील (Sangli) रिलायन्स ज्वेलर्सवर (Reliance Jewellers) टाकण्यात आलेल्या दरोड्याप्रकरणी मुख्य सूत्रधाराला बिहारच्या पाटणामधून अटक करण्यात आलीय. सुबोध सिंह ईश्वर प्रसाद सिंह असे संशयिताचं नाव आहे. या आरोपीवर विविध ठिकाणी 32 गुन्हे दाखल आहेत. तसेच जेलमधून तो टोळी चालवत असल्याचे तपासात समोर आले होते. डेहराडून येथील रिलायन्स ज्वेलर्स चोरीच्या घटनेमागेही हेच असावेत असा संशय पोलिसांना आहे. संशयित सुबोधसिंग यास सांगलीत आणण्यात आलं आहे. त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या चौकशीमध्ये आणखी आरोपी आणि मुद्देमाल हस्तगत केले जाणार आहेत. सांगली पोलिसांनी बिहार जेलमधून या मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली आहे.