Friday, January 16, 2026
HomeइचलकरंजीIchalkaranji : कोष्टी समाजाचा राज्यव्यापी वधु-वर परिचय मेळावा संपन्न

Ichalkaranji : कोष्टी समाजाचा राज्यव्यापी वधु-वर परिचय मेळावा संपन्न

इचलकरंजी/प्रतिनिधी –
देवांग कोष्टी समाजाचा वधु-वर परिचय मेळावा येथी वेदभवन कार्यालयात संपन्न झाला. या मेळाव्यास संपूर्ण राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करत आजवरच्या कार्याचा आढावा घेतला.

उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत अशा मेळाव्यांची आज गरज असल्याचे सांगत या कार्यक्रमाचे कौतुक केले. प्रारंभी स्वागत संयोजक दिलीपराव भंडारे यांनी केले. सदर मेळाव्यास राज्यभरातून कोष्टी बांधवांनी हजेरी लावली होती.
याप्रसंगी हातकणंगले तहसिलदार सौ. कल्पना भंडारे, प्रताप होगाडे, विठ्ठलराव डाके, राजेंद्र ढवळे (कोल्हापूर), अर्जुन दिवटे (तासगांव), अविनाश चोथे (विटा), हणमंतराव भंडारे, प्रशांत सपाटे, वैद्यगुरूजी विजय मुसळे (इचलकरंजी), सचिन लोले (वडगांव) आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -