Friday, November 22, 2024
Homeअध्यात्मदत्त जयंती उत्सव 2023 कशी साजरी करावी? पूजा कशी करावी? संपूर्ण माहिती;...

दत्त जयंती उत्सव 2023 कशी साजरी करावी? पूजा कशी करावी? संपूर्ण माहिती; नक्की वाचा सविस्तर

 

 

मित्रांनो, मार्गशीष महिना ची सुरुवात झाली आहे आणि या मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त जयंती असते. हा दत्तजयंतीचा उत्सव कशा प्रकारे साजरा करावा व दत्त जयंती ची पूजा कशी करावी? याची संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत. या मार्गशीष महिन्याच्या सुरुवातीला पंधरा दिवस म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याचा सुरुवातीपासून ते दत्तजयंती पर्यंत सर्व जण विविध असे पारायण करीत असतात.

 

विविध अशी सेवा करीत असतात. विशेष अशी पूजा करीत असतात. असे म्हटले जाते की, दत्तजयंतीच्या दिवशी पृथ्वीवर दत्त हे तत्त्व खूप मोठ्या प्रमाणात असते आणि या दिवशी जी काही आपण पूजा, आराधना करतो ती देवाला मान्य होते. व त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळते. सर्व जणांचे अशीही मान्यता आहे की, दत्त हे देव असे आहे की, त्यांची थोडी जरी आपण आराधना केली. व ती मनापासून केली.

 

तर, त्याचे फळ हे आपल्याला लवकरात लवकर मिळत असते. श्री दत्त हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे अवतार म्हटले जातात. हे तिन्ही देव यांच्यामध्ये सामावले आहेत असे म्हटले जाते. त्याच बरोबर गुरु व देव हे दोन्हीही यांच्यामध्ये सामावले आहेत. म्हणून त्यांना श्रीगुरुदेवदत्त असे म्हटले जाते. संपूर्ण विश्वाचे हे प्रथम गुरू मानले जातात. नाथ संप्रदायाचे देखील श्री गुरुदेव दत्त हे गुरू मानले जातात.

 

दत्तजयंतीच्या दिवशी जेवढे करता येईल तेवढे धार्मिक कार्य आपण करावेत. या दिवशी आपण दत्ताची विशेष अशी पूजा करावी. त्यांचा मंत्र जप करावा किंवा “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या मंत्राचे उच्चारण सतत मुखी ठेवावे. दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून चौरंग ठेवून त्यावर लाल कापड अंथरावे.

 

व त्यावर दत्तात्रेय यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा व अनामिकेने गंध किंवा कुंकू लावावे. आपल्या हातामध्ये थोडे पाणी फुल आणि अक्षदा घेऊन श्री दत्त यांना आमंत्रित करावे व “श्री गुरुदेव दत्त” या मंत्राचा जप करून ते पाणी व फुल, अक्षदा दत्त यांना अर्पित करावे. श्री दत्त यांचे आवडीचा फुल निशिगंध जार्ई ची फुले अर्पण करावी. सात किंवा सातच्या पट्टीमध्ये ही फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत.

 

चंदन किंवा केवड्या अशी सुगंधी अगरबत्ती आपल्याला लावायची आहे. धूप दीप लावून सुंठवडा करावा. पूजा झाल्यानंतर सुंठवडा चा नैवेद्य दाखवावा. नैवेद्यासाठी सुंठवडा याचा खुप मान असतो आणि हाच नैवेद्य श्री दत्त यांना मान्य देखील असतो. पूजा झाल्यानंतर आपण जो आहार घेतो तो सात्विक आहार घ्यावा. आहारामध्ये कांदा, लसणाचा वापर करू नये. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारचे मांसाहार किंवा मध्यपान देखील करू नये.

 

जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी व्रत करायला काही हरकत नसते. ते अतिशय पुण्याचे काम मानले जाते. जर तुम्हाला गुरु देव दत्तांचा पूजन करायचे असेल तर, गायत्री मंत्राचे जप करावे. “श्री गुरुदेव दत्त” या मंत्राचा जप अनियमित करावा. अशाप्रकारे दत्त जयंतीचा उत्सव व पूजा करावी. या दिवशी शक्य झाल्यास दत्तमंदिर या मंदिरात जाऊन श्री दत्तांचे दर्शन घ्यावे. कोणतेही अनिष्ट कृत्य करू नये. घरांमध्ये अपशब्द बोलू नये. कोणालाही वाईट बोलू नये. त्याचबरोबर करता येईल तेवढे दानधर्म आपण या दिवशी करावे.

 

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -