जोतिषशास्त्रात सूर्याचा संबंध आत्मविश्वास, सरकारी कामकाज, करिअर आणि प्रतिष्ठेशी जोडला जातो. त्यामुळे सूर्य जेव्हा राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम नोकरी, आर्थिक स्थिती, नाती आणि आरोग्यावरही दिसून येतो.
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. आत्मबल, नेतृत्व क्षमता, सन्मान आणि ऊर्जा यांचे प्रतीक म्हणून सूर्य ओळखला जातो. सूर्य साधारणपणे दर महिन्याला राशी बदलतो आणि त्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. ज्योतिषीय गणनेनुसार १४ मार्च २०२६ रोजी रात्री १२ वाजून ४१ मिनिटांनी सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीचा स्वामी गुरु (बृहस्पति) असून त्यांना ज्ञान, धर्म आणि सकारात्मकतेचा ग्रह मानले जाते. त्यामुळे सूर्याचा हा गोचर अनेकांच्या जीवनात नवी संधी घेऊन येऊ शकतो. मात्र काही राशींनी या काळात विशेष सावधगिरी बाळगणेही आवश्यक ठरू शकते.
मीन राशीत सूर्याचा गोचर
ज्योतिषशास्त्रात सूर्याचा संबंध आत्मविश्वास, सरकारी कामकाज, करिअर आणि प्रतिष्ठेशी जोडला जातो. त्यामुळे सूर्य जेव्हा राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम नोकरी, आर्थिक स्थिती, नाती आणि आरोग्यावरही दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य सिंह राशीचा स्वामी असून आत्मबल आणि अधिकाराचे प्रतिनिधित्व करतो. सूर्य मीन राशीत प्रवेश करताच तो गुरु ग्रहाच्या ऊर्जेच्या प्रभावाखाली येतो. मीन राशीचा संबंध अध्यात्म, कल्पनाशक्ती आणि भावनिक संतुलनाशी जोडला जातो. त्यामुळे या गोचरकाळात अनेकांमध्ये आध्यात्मिकतेकडे कल वाढू शकतो. तसेच काही राशींना करिअर आणि आर्थिक क्षेत्रात नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेवूया १२ राशींना सूर्याच्या या गोचराचा कोणता परिणाम होणार याविषयी….
मेष
मेष राशींच्या जातकांचासाठी चढ-उताराचा काळ
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा चढ-उताराचा राहू शकतो. अपेक्षित परिणाम मिळण्यास विलंब होऊ शकतो. नोकरीत कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. काही जण नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात. आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. व्यापारात गुंतवणूक करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराशी किरकोळ गैरसमज होऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टीने पाय किंवा मांड्यांमध्ये वेदना जाणवू शकतात.
वृषभ
वृषभ राशीच्या जातकांना सकारात्मक परिणाम मिळणार
वृषभ राशीसाठी हा गोचर सकारात्मक परिणाम देणारा ठरू शकतो. सुखसोयी वाढण्याची शक्यता असून कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. काहींना नवी नोकरी किंवा चांगले पद मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. व्यापारातही लाभ मिळू शकतो. वैवाहिक जीवनात संबंध मधुर राहतील.
मिथुन
मिथुन राशीच्या जातकांच्या करिअरच्या दृष्टीने अनुकूल काळ
मिथुन राशीसाठी हा गोचर करिअरच्या दृष्टीने अनुकूल ठरू शकतो. कामानिमित्त प्रवास वाढू शकतो आणि त्यातून नवीन संधी मिळू शकतात. नोकरीत मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. पदोन्नती किंवा प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. व्यापारातही लाभाचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती संतुलित राहील आणि उत्पन्नात वाढ होऊ शकते. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराशी संबंध अधिक मजबूत होतील.






