Monday, December 23, 2024
Homeक्रीडानव्या वर्षात रोहित शर्मा घेणार कठोर निर्णय, आपल्याच मित्राला बसवणार टीमच्या बाहेर?

नव्या वर्षात रोहित शर्मा घेणार कठोर निर्णय, आपल्याच मित्राला बसवणार टीमच्या बाहेर?

 

 

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सीरीजमधील दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीपासून न्यूलँड्समध्ये खेळला जाणार आहे. टीम इंडिया सीरीज जिंकण्याच्या इराद्याने येथे पोहोचली होती. पण आता हे स्वप्न अपूर्णच राहणार आहे. कारण टीम इंडियाला पहिल्या टेस्टमध्ये मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. आता टीम इंडिया सीरीजमधला दुसरा आणि या वर्षातील पहिला कसोटी सामना खेळणार आहे.टीम इंडिया दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या न्यूलँडसमध्ये खेळणार आहे. कॅप्टन रोहित शर्माला सीरीज ड्रॉ करायची असेल, तर कठोर निर्णय घ्यावे लागतील. दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडिया दोन मोठे बदल करेल, अशी अपेक्षा आहे.

 

पहिला बदल काय असेल?प्रसिद्ध कृष्णाला बाहेर बसवून त्याजागी मुकेश कुमारला संधी हा पहिला बदल असू शकतो. दुसऱ्या टेस्टआधी कॅप्टन रोहित शर्माने बराचवेळ नेट्समध्ये मुकेश कुमारसोबत घालवलाय. त्यामुळे मुकेश कुमारला संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.

 

दुसरा बदल काय असेल?

 

दुसरा बदल म्हणजे रवींद्र जाडेजा टीममध्ये पुनरागमन करु शकतो. कारण पहिल्या टेस्ट मॅचआधी रवींद्र जाडेजा अनफिट होता. त्यामुळे तो खेळला नाही. जाडेजा फिट होऊन प्लेइंग 11 मध्ये आला, तर रविचंद्रन अश्विनला बाहेर बसाव लागेल.

 

या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड काय?

 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याधी टीम इंडिया हे बदल करु शकते. टीम इंडियाने या मैदानावर आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. यात दोन सामने ड्रॉ केलेत. अन्य चार सामन्यात पराभव झालाय. भारतीय टीमचा पहिल्या सामन्यात एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाला होता. टीम इंडियाकडे आता फक्त मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे. कारण मालिका विजय मिळू शकत नाही. ही टेस्ट सीरीज फक्त दोन सामन्यांची आहे.

 

अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग-11

 

रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, शार्दुल ठाकूर,

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -