आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर क्रिकेट चाहत्यांना हे टी 20 वर्ल्ड कप 2024 चे वेध लागले आहेत. टीम इंडियाला वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे टीम इंडियाची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा आणखी वाढली. त्यामुळे आता टी 20 वर्ल्ड कपच्या प्रतिक्षेत आहेत.
या वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. वर्ल्ड कपमध्ये खेळणारे 20 संघ आधीच निश्चित झाले आहेत. त्यामुळे आता वेळापत्रक केव्हा जाहीर होणार याबाबत चर्चा आहे. या दरम्यान वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.टी 20 वर्ल्ड 2024 चं वेळापत्रक हे आज 5 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने सोशल मीडियावर पोस्ट करुन याबाबतची माहिती क्रिकेट चाहत्यांना दिली आहे. या स्पर्धेतील एकूण 20 संघांना ग्रुपमध्ये विभागण्यात येणार आहे. त्यामुळे आता टीम इंडिया-पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्ध्यांना एकच ग्रुपमध्ये ठेवण्यात येतं का, याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणारे 20 संघ
दरम्यान एका ट्रॉफीसाठी एकूण 20 संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 10 संघांनी थेट वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलं. तर स्कॉटलँड,आयर्लंड, पापुआ न्यू गिनी, कॅनेडा, नेपाळ, ओमान, नामिबिया आणि यूगांडा या संघांनी पात्रता फेरीतून वर्ल्ड कपचं तिकीट मिळवलं. तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे यजमान आहेत. त्यामुळे या 2 संघांना थेट तिकीट मिळालं.
टी 20 वर्ल्ड कप वेळापत्रक 5 जानेवारीलादरम्यान आतापर्यंत एकूण 8 टी 20 वर्ल्ड कप स्पर्धांचं आयोजन यशस्वीरित्या पार पडलं आहे. या स्पर्धेला 2007 पासून सुरवात झाली. टीम इंडियाने पहिल्याच झटक्यात टी 20 वर्ल्ड कप जिंकला. तेव्हापासून ते आतापर्यंत वेस्टइंडिज आणि इंग्लंडने प्रत्येकी संयुक्तरित्या सर्वाधिक 2 वेळा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. तर पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या 3 संघांनीही प्रत्येकी 1-1 वेळा ट्रॉफी उंचावली आहे.