Thursday, January 9, 2025
Homeराजकीय घडामोडीशिंदे गटाला कायमचे दरवाजे बंद?, उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान काय?; अभिनेते...

शिंदे गटाला कायमचे दरवाजे बंद?, उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान काय?; अभिनेते किरण माने ठाकरे गटात

 

 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने ठाकरे गटात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला चांगलंच बळ मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर आज पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. शिंदे गटातील एकाही व्यक्तीला या पुढे शिवसेनेत प्रवेश देण्यात येणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिंदे गटाला आता उद्धव ठाकरे गटात कायमचा प्रवेश बंद झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे.प्रसिद्ध अभिनेते किरण माने आणि बीडमधील काही कार्यकर्त्यांना आज मातोश्रीवर येऊन ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी या सर्वांना शिवबंधन बांधून त्यांना ठाकरे गटात प्रवेश दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलं. आपल्या घरात आल्यासारखं वाटतंय. पूर्वी शिवसैनिक होतो, आजही शिवसैनिक आहे, अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते. या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला शिवसेनेत प्रवेश देणार नसल्याची घोषणा केली.

 

ते खोक्यात बंद

तुमच्या भावना फार महत्त्वाच्या शब्दात मांडल्या. आपल्या घरात आल्यासारखं वाटतं असं मनोगत तुम्ही व्यक्त केलं. पण काही लोक भटकंतीला गेले. त्यांना परत घरात घेणार नाही. ते खोक्यात बंद झाले आहेत. त्यांना खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.तुम्ही आल्याने ताकद वाढली

राजेशजी तुमचं स्वागत करतो. शिवसेनेसारखं प्रेम कुठल्याही पक्षात मिळत नाही. म्हणूनच घरात आल्यासारखं वाटतं असं तुम्ही म्हणालात. शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा एक संवाद आहे. आज मेरे पास ये है, वो है… तुम्हारे पास क्या है? तुम्हाला सांगतो, आपल्याकडे शिवसैनिकांची माया प्रेम आणि जिद्द आहे. हिंमत आपुलकी विकली जात नाही, विकत घेता येत नाही. लढाई मोठी आहे. तुमच्या सारखे कट्टर एकवटले तर लढाई सोपी आहे. तुमच्या सारखे लोक आले तर डगमगता येत नाही. तुम्ही आलात आपली ताकद वाढली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. खोके घेणाऱ्यांनी पक्ष चिन्ह घेतलं तरीही त्यांना स्वप्नात उद्धव ठाकरे दिसतो. कारण उद्धव ठाकरे एकटा नाही. उद्धव ठाकरेंसोबत महाराष्ट्र आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.

 

काळाराम मंदिरात जाणार

मी काळाराम मंदिरात जाणार आहोत. राम मंदिरासाठी आपण भोगलंय. कोर्टाच्या आदेशाने स्वप्न पूर्ण होतंय. कोर्टालाही निर्णय द्यायला 25 ते 30 वर्ष लागली. भाजपचं सरकार आलं. पण राम मंदिरासाठी ते कायदा करू शकले नाही. कोर्टाच्या आदेशाने आता राम मंदिर होत आहे. त्याचा आनंद आहे. काळाराम मंदिरात जात आहोत. त्याचं वेगळंपण आहे. राम सर्वांचा आहे. राम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला होता. म्हणूनही त्याचं वेगळं स्थान आहे. त्यामुळे मी तिथे जाणार आहे. गोदातीरी आरती करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -