इचलकरंजी /ताजी बातमी ऑनलाईन टीम
शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार 8 जानेवारी रोजी इचलकरंजी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी दिली.
विविध विकासकामे आणि धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार श्रीकांत शिंदे हे इचलकरंजीत येत आहेत. सकाळी त्यांच्या उपस्थितीत कोल्हापूर नाका येथे शिवसेना शहर शाखेचे उद्घाटन तेथून मोटरसायकल रॅलीने शिवतीर्थ येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे.
राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे अनुकंपा तत्वावर महानगरपालिका सेवेत आलेल्यांना नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर गांधी पुतळा येथील पुरवठा कार्यालयासमोर संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे वाटप होणार आहे.
पंचगंगा नदीतीरावरील वरद विनायक मंदिरात सुरु असलेल्या श्री 108 गणेश महायज्ञ कुंड याठिकाणी भेट दिल्यानंतर झेंडा चौक येथील मातोश्री भवन याठिकाणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ठ विधानसभानिहाय कार्यकर्त्यांची आढावा बैठक होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांसाठी खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षिरसागर, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाप्रमुख श्री. माने यांनी दिली. यावेळी शहरप्रमुख भाऊसो आवळे ,प्रकाश पाटील, रवि लोहार, रवि रजपुते, वैशाली डोंगरे, रुपाली चव्हाण, दीपक पाटील आदी उपस्थित होते.