Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगदहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात बोर्ड करणार चौकशी

दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात बोर्ड करणार चौकशी

 

 

दहावी, बारावीची परीक्षा यंदाही फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होत आहे. विद्यार्थी अभ्यासाची जोरदार तयारी करत आहे. त्याचवेळी परीक्षा मंडळाकडून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु या परीक्षेसंदर्भात आलेली आकेडवारीमुळे परीक्षा मंडळास चौकशी करावी लागणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षांपेक्षा वाढली आहे. अचानक विद्यार्थी संख्या कशी वाढली? यासंदर्भात आता मंडळ चौकशी करणार आहे.मागील वर्षांच्या तुलनेत वाढ

बारावीची परीक्षा आता २१ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. ही परीक्षा १९ मार्चपर्यंत चालणार आहे. दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान होत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात आले. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू केली होती. मागील वर्षी दहावीसाठी १५ लाख ६१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले तर बारावी परीक्षेसाठी १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. परंतु यंदा त्यात वाढ झाली आहे. दहावीची विद्यार्थी संख्या १६ लाख १० हजार झाली आहे. तर बारावीची संख्या १५ लाख १५ हजार झाली. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षीच्या तुलनेत वाढल्याचे दिसून आले आहे. दर वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या का वाढली, त्या मागे अन्य काही विशेष कारणे आहेत का, याची चौकशी मंडळ करणार आहे.विद्यार्थी संख्येत आणखी होणार वाढ

दहावीचे सुमारे २५ हजार विद्यार्थी यंदा वाढले आहे. ते का वाढले आहेत, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी आणखी मुदत आहे. यामुळे या विद्यार्थिसंख्येत आणखी वाढ होणार आहे. दरम्यान दहावी, बारावीची परीक्षा काही दिवसांवर आली असताना राज्यभरातील शिक्षण संस्थाचालक पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहे. दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याची तयारी त्यांनी सुरु केली आहे. शासनाकडे रखडलेले शेकडो कोटींचे शिक्षकेतर अनुदान ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -