ग्रेट रिपब्लिक डे सेल उद्या 13 जानेवारी रोजी प्राइम यूजर्ससाठी दुपारपासून सुरू होणार आहे. ई-कॉमर्स कंपनीने आधीच विशलिस्ट पेज लॉन्च केले आहे आणि गेट सेल रेडी सेक्शन सादर केलं आहे.यातच Amazon वरच सिक्रेट सेक्शन तयार करण्यात आलं आहे. जिथून फक्त 1 रुपयात शॉपिंग करता येते? आज आम्ही तुम्हाला Amazon च्या Sample Mania सेक्शनबद्दल सांगणार आहोत. Sample Mania ऑफर काय आहे?
Amazon वरील सॅम्पल मॅनिया सेक्शनमध्ये ग्राहकांना खरेदी करण्यापूर्वी प्रोडक्टचे सॅम्पल वापरून पाहण्यासाठी दिले जातात. सामान्यतः अॅमेझॉन हे सॅम्पल 99 रुपयांना विकतो. मात्र रिपब्लिक डे सेल निमित्ताने खरेदीदारांना हे सॅम्पल फक्त 1 रुपयात मिळू शकतात.
सेल दरम्यान, Amazon दररोज दुपारी 3 वाजता नवीन सॅम्पल सादर करेल, जिथे तुम्हाला 1 रुपयात प्रोडक्टचे सॅम्पल खरेदी करण्याची संधी मिळेल.Amazon India वेबसाइटवरील सॅम्पल मॅनिया सेक्शनमध्ये कॉस्मेटिक आणि हेल्थशी संबंधित प्रोडक्टचे सॅम्पल ग्राहकांना पाहायला मिळणार आहेत.13 जानेवारी रोजी ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरू झाल्यावर, सेलिंग पेजवर सॅम्पल मॅनिया सेगमेंटला भेट द्या.
तुम्हाला हवे आहेत, ते प्रोडक्ट तुम्ही येथे शोधू शकता आणि तुमच्या कार्टमध्ये अॅड करू शकता. कार्ट पेजवर, “Collect one sample” पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला हे प्रॉडक्ट पाठवलं जाईल. असं असलं तरी अद्यापही ऑर्डर अॅक्टिव्ह झालेली नाही. ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरु झाल्यावर ग्राहकांना ही ऑफर पाहायला मिळणार आहे.