Friday, June 27, 2025
Homeराजकीय घडामोडीदिवाळी साजरी करा, पण दिवाळं निघालं त्यावरही चर्चा करा - उद्धव ठाकरेंचा...

दिवाळी साजरी करा, पण दिवाळं निघालं त्यावरही चर्चा करा – उद्धव ठाकरेंचा टोला

 

 

22 जानेवारी रोजी नाशिक येथील काळाराम मंदिरात (Nashik Kalaram Mandir) आरती करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच या कार्यक्रमाचे राष्ट्रपती मुर्मू यांना आमंत्रण देणार असल्याचेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. काळाराम मंदिरातील रामाच्या प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, पण पण दिवाळं निघालं त्यावर चर्चा करा, असा टोलाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. तसेच मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

कारसेवक नसते तर अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं नसतं. मी अयोध्येत शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होते. यापुढेही अयोध्याला जेव्हा जेव्हा मला वाटेल तेव्हा तेव्हा जाईल, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

 

मी कडवट हिंदुत्ववादी आहे. राम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान सर्वांना माहित आहे. आम्ही 22 तारखेला काळाराम मंदीरात जाऊन दर्शन घेणार आहे. यावेळी आम्ही काळाराम मंदीरातील कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींना देखील आमंत्रण देणार आहे. 22 तारखेच्या राममंदाच्या सोहळ्याचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -