सध्याच्या आधुनिक युगात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस् फक्त मनोरंजनाचे साधनच नाही तर पैसे कमाईचा देखील एक मार्ग बनला आहे. यामध्ये युट्युब आणि इंस्टाग्राम वरून तर लोक बक्कळ कमाई करत आहेत.जर तुमचा कंटेंट चांगला असेल तर युट्युब तुम्हाला त्याचे चांगले पैसे देतो. तसेच जितका कमी सेकंदाचा व्हिडिओ आणि कन्टेन्स असेल तर इंस्टाग्राम तुम्हाला याचे चांगले पैसे देते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का युट्युब आणि इंस्टाग्राम सोडून देखील तुम्ही इतर ॲपवरून देखील पैसे कमवू शकता. चला तर मग जाणून घेऊया हे ॲप्स नक्की कोणते आहेत.
लाईक ॲप तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करून पैसे कमवू शकता. या ॲपवर तुम्हाला व्हिडिओच्या व्ह्यूजच्या आधारावर क्राऊन दिला जातो. ज्याला तुम्ही रुपयांमध्ये कन्वर्ट करून पैसे कमवू शकता. परंतु यावर टाकण्यात येणारा कंटेंट देखील तितकाच कॉलिटी असायला हवा. हे ॲप तुम्हाला युट्युब इंस्टाग्राम एवढे पैसे देत नसले तरी त्यापेक्षा निम्मे पैसे तुम्हाला नक्कीच मिळतील.
मोज अँपवर तुम्ही इंस्टाग्राम युट्युबप्रमाणे व्हिडिओ तयार करू शकता. तसेच लोकांशी कनेक्ट होऊन त्यांच्याशी संवाद साधू शकता. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही मासिक कमाई करू शकता. हे ॲप तुम्हाला कोलॅबरेशनची सुविधा देते. यावर तुम्ही एफिलिएट मार्केटिंग सुद्धा करू शकता.
तुम्ही ज्या पद्धतीने इंस्टाग्राम आणि युट्युबसाठी व्हिडिओ बनवता त्याच पद्धतीने या ॲपसाठी देखील व्हिडिओ बनवू शकता. या व्हिडिओला जेवढे व्ह्यूज मिळतील तेवढेच कॉइन्स तुम्हाला देण्यातकॉइन तुम्ही रुपयात बदलू शकता आणि आपले महिन्याचे वेतन मिळवू शकता.