Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्र1.4 लाख मोबाईल नंबर ब्लॉक, 3 लाख सिम बंद; 500 जणांना अटक,...

1.4 लाख मोबाईल नंबर ब्लॉक, 3 लाख सिम बंद; 500 जणांना अटक, सरकारची मोठी कारवाई

केद्र सरकारने डिजिटल फ्रॉडवर नियंत्रण ठेवण्यासाठी आतापर्यंत 1.4 लाख मोबाईल नंबर ब्लॉक केले आहेत. हे मोबाईल नंबर आर्थिक फसवणुकीशी संबंधित होते. वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आर्थिक सेवा क्षेत्रातील सायबर सुरक्षेबाबत बैठक झाली.एपीआय (एप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) इंटिग्रेशनद्वारे सिटीझन फायनान्शिअल सायबर फ्रॉड इन्फॉर्मेशन अँड मॅनेजमेंट सिस्टम (CFCFRMS) प्लॅटफॉर्मवर बँका आणि आर्थिक संस्थांचा समावेश करण्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

 

निवेदनानुसार, सीएफसीएफआरएमएस प्लॅटफॉर्म नॅशनल सायबर क्राइम इन्फॉर्मेशन पोर्टल (NCRP) शी जोडला जाईल. यामुळे पोलीस, बँका आणि आर्थिक संस्था यांच्यात चांगला समन्वय साधता येईल.

 

दूरसंचार विभागाने खूप एसएमएस पाठविणाऱ्या 35 लाख प्राथमिक युनिट्सचे विश्लेषण केलं. यापैकी 19,776 एसएमएस पाठवण्यात गुंतलेल्या संस्थांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आलं आहे. या संदर्भात 500 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली असून अंदाजे 3.08 लाख सिम ब्लॉक करण्यात आले आहेत. देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे, विशेषत: सायबर गुन्हेगार लोकांना कॉल करून फसवणूक करत आहेत.

 

सायबर फसवणूक टाळण्यासाठी नेहमी सतर्क आणि सावध राहण्याची गरज आहे. एसएमएस आणि ईमेलवर येणाऱ्या कोणत्याही अनोळखी लिंकवर कधीही क्लिक करू नका. तुमच्या बँक खात्याशी संबंधित पर्सनल माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. कोणताही संशयास्पद कॉल, मेसेज किंवा मेललारिप्लाय देऊ नका आणि त्यांना ब्लॉक करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -