Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगशिष्यवृत्तीला विद्यार्थी मुकल्यास महाविद्यालय जबाबदार!

शिष्यवृत्तीला विद्यार्थी मुकल्यास महाविद्यालय जबाबदार!

शिष्यवृत्तीबाबत (scholarship) वारंवार सूचना देऊनही महाविद्यालयांनी दुर्लक्ष केल्याने आता अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी स्पष्ट केले. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नागपूर विभागातील ३२,५७३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे (scholarship) अर्ज अद्याप सादर केलेले नसून १९,७९६ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी प्रलबित ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वारंवार सूचना देऊनही महाविद्यालयांनी दुर्लक्ष केल्याने आता अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी स्पष्ट केले.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून संयुक्तपणे मॅट्रिकोत्तर शिष्यवृती प्रदान केली जाते. यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज भरण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली.

२०२३-२४ मध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी १२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ५२,६२२ अर्जांची ऑनलाईन नोदणी झाली आहे.त्यापैकी समाज कल्याण विभागाने २७,६२० अर्ज मंजूर केलेत. तर १९,७९६ अर्ज महाविद्यालयाकडेच प्रलबित आहे. तसेच ३,६९० विद्यार्थ्यांनी महविद्यालयाकडे त्रुटीपूर्तता करून अर्ज सादर केले नाहीत.

विशेष म्हणजे २०२२-२३ मध्ये नागपूर विभागात एकूण ८५,१९५ इतक्या विद्यार्थाना शिष्यवृती प्रदान करण्यात आली होती. आतापर्यंत ५२,६२२ अर्जांची नोंदणी म्हणजेच फक्त ६१ टक्केच अर्जांचीच ऑनलाईन नोंदणी झाली आहे.

त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी अद्याप शिष्यवृतीसाठी नोंदणीच केली नसल्याचीही बाब समोर आली आहे. नागपूर विभागातील महाविद्यालय स्तरावर अनुक्रमे नागपूर १०,२८६, वर्धा २,३७२, भंडारा २,२७३, गोंदिया १,३२०, चंद्रपूर २,९१७ तर गडचिरोली ६२८ असे एकूण १९,७९६ इतके अर्ज प्रलंबित आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयावर जबाबदारी निश्चित करण्यात येऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी शासनाकडे प्रस्तावित करण्यात येईल- डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, नागपूर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -