कृष्णा नदीत सांडपाणी सोडल्याप्रकरणी सांगली महापालिकेला 90 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत पालिकेला नोटीस धाडली आहे.शहरातील सांडपाणी (Sewage) कोणतीही प्रक्रिया न करता कृष्णा नदीत (Krishna River) सोडल्याप्रकरणी सांगली महापालिकेला (Sangli Municipal Corporation) 90 कोटी रुपयांचा दंड करण्यात आलाय.
ही रक्कम पंधरा दिवसांत भरावी, अशी नोटीस बजावली आहे. हरित लवादाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात ती आली. याप्रकरणी स्वतंत्र भारत पक्ष आणि जिल्हा संघर्ष समितीने जनहित याचिका दाखल केली होती.