मराठा आरक्षण आंदोलन निर्णायक टप्प्यावर असतानाच आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोपांची राळ उठलेली दिसतेय. मराठा आरक्षण आंदोलनात सहकारी राहिलेल्या लोकांकडूनच मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. काल अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आज महिला आंदोलकाने मनोज जरांगेंवर आरोप केलेत.
मराठा आंदोलन कर्त्या आणि मनोज जरांगे यांच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या म्हणण्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील वागतात, असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी केला आहे.
त्या’ नेत्याचा जरांगेंना फोन- वानखेडे
शरद पवार यांचाच फोन मनोज जरांगे यांना येत होता. मराठ्यांना आरक्षण मिळत होतं. म्हणून अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला गेला. पुण्यात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी लावले होते. टोपी घालून मनोज जरांगे अख्खं पुणे फिरले.
शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे पाटील करतात. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवारच आहेत, असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर केला आहे.
बातमी अपडेट होत आहे.