ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करुन इतर ग्रहांशी युती करतात. ज्याचा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर परिणाम होतो. दोन दिवसांपूर्वीच बुधदेवाने मीन राशीत प्रवेश केला आहे. जिथे आधीपासूनच राहू विराजमान आहेत. या दोन्हीं ग्रहांची मीन राशीत युती निर्माण केली आहे. ही युती १८ वर्षांनी तयार झाली आहे. राहू आणि बुधाची युती २५ मार्चपर्यंत राहणार आहे. त्यामुळे काही राशींना बुध आणि राहूच्या युतीने मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा?
कर्क राशी
राहू आणि बुधदेवाची युती कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची अपेक्षा आहे. जुने अडकलेले पैसे मिळाल्याने तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. एखादे प्रलंबित सरकारी काम पूर्ण होऊ शकते. कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तथापि, या काळात तुम्ही नवीन घर किंवा नवीन कार खरेदी करू शकता. या काळात, तुम्हाला एक नवीन डील मिळू शकेल. नोकरदारांना नवीन नोकरी मिळण्यात यश मिळू शकेल.
वृश्चिक राशी
राहू आणि बुधदेवाची युती वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरु शकते. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला उत्पन्नाचे आणखी स्त्रोत देखील मिळू शकतात. तुम्ही एकामागून एक अनेक कामे पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकता. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना पद, प्रतिष्ठा इत्यादी फायदे मिळण्याची शक्यता आहे.
मकर राशी
राहू आणि बुधदेवाची युती मकर राशीच्या लोकांसाठी सुखाचे दिवस घेऊन येणारी ठरु शकते. विशेषत: जे लोक नोकरदार आहेत, त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये देखील चांगला नफा होऊ शकतो. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो. तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. करिअरमध्ये सुवर्णसंधी मिळू शकतात. करिअरच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)