Monday, November 24, 2025
Homeसांगलीवारणा धरण परिसरात भूकंपाचा धक्का, वर्षात तिसरा भूकंप

वारणा धरण परिसरात भूकंपाचा धक्का, वर्षात तिसरा भूकंप

विकास शहा शिराळा : वारणा धरण (ता.शिराळा ) परिसरात भूकंपाचा सौम्य स्वरूपाचा धक्का जाणवला. आज, सोमवारी पहाटे ५ वाजून १ मिनिटांनी ३.० रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती शाखाधिकारी गोरख पाटील यांनी दिली.या वर्षातील हा तिसरा भूकंप आहे.

आजच्या या भूकंपाचा धक्का वारणावती परिसरात जाणवला नाही. या धक्क्यामुळे कोणतीही जिवीत किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्र बिंदू वारणा धरणापासुन २२.४ किलो मीटर अंतरावर होता.

भूकंपाच्या धक्क्यामुळे वारणा धरणाला कोणताही धोका नाही असे धरण प्रशासनाने सांगितले. २ फेब्रुवारी २०११ पासून ३ रिस्टर स्केल वरील झालेला हा ९१ वा भूकंप आहे. दि.१६ ऑगस्ट रोजी सकाळी ६:३५ वाजता सौम्य ३.२ रिस्टर स्केलचा भूकंप जाणवला होता. तर १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ६:४७ वाजता सौम्य ३ रिस्टर स्केल चा भूकंप जाणवला त्याचा केंद्रबिंदू चांदोली धरणापासून १५.२ किलोमीटरवर होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -