Monday, December 23, 2024
Homeक्रीडाऋषभ पंत आयपीएल खेळला तर वर्ल्ड कपमध्ये घेणार? जय शाह स्पष्टच बोलले…

ऋषभ पंत आयपीएल खेळला तर वर्ल्ड कपमध्ये घेणार? जय शाह स्पष्टच बोलले…

आयपीएलच्या येत्या हंगामामध्ये टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत खेळणार हे नक्की आहे. 22 मार्चपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे. आयपीएलनंतर टी-20 वर्ल्ड कप असून या वर्ल्ड कपमध्ये खेळायचं असल्यास बीसीसीआयने पंतला एक अट घातली आहे.

टीम इंडियाचा लढवय्या खेळाडू ऋषभ पंत अपघातानंतर आता कमबॅक करत आहे. अपघातानंतर त्याने मेहनत घेत परत एकदा स्वत:ला क्रिकेट खेळण्यासाठी तयार केलं आहे.ऋषभ पंत याला भीषण अपघातामध्ये जबर दुखापत झाली होती. या अपघातामध्ये त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झालेली. गुडघ्याचे दोन लिगामेंट तुटले होते, त्यांना जोडण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पंतने बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे विकेटकीपिंग सुरू केली होती.

त्यासोबतच त्याने काही सराव सामनेही खेळले होते.पंत आता फिट होत असल्याने तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पंतच्या वर्ल्ड कप खेळण्याबाबत मोठं विधान केलं आहे.पंतने जर चांगली बॅटींग आणि कीपिंग करत आहे. पंत जर वर्ल्ड कप खेळणार असेल तर आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आता तो आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहावं लागणार असल्याचं जय शाह यांनी म्हटलं आहे.दरम्यान, ऋषभने कमबॅक करण्यासाठी फिटनेसवर जबरदस्त काम केलं आहे. मात्र आम्हाला काही मोठे निर्णय घ्यावे लागणार असल्याचं दिल्ली कॅपिटल्स संघाचे कोच रिकी पॉन्टिंगने म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -