Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगदारू पिऊन शिवी दिल्याचा जाब विचारला, तरूणासह आईवरही केला जीवघेणा हल्ला

दारू पिऊन शिवी दिल्याचा जाब विचारला, तरूणासह आईवरही केला जीवघेणा हल्ला

दारू पिऊन शिवी दिल्याचा जाब विचारला, तरूणासह आईवरही केला जीवघेणा हल्ला

 

कल्याणमध्ये सध्या गुन्हेगारांची दहशत माजली असून सामान्य नागिरकांना मात्र जीव मुठीत धरून जगावं लागत आहे. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. दारू पिऊन आईवरून शिवी देणाऱ्याला जाब विचारायला गेलेल्या तरूणावर चाकूने हल्ला करण्यात आला. एवढंच नव्हे तर त्याला वाचवण्यासाठी त्याची आई मधे आली असता, तिलाही काही तरूणांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत रुपेश सलफे नावाचा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तीन जणाविरुद्ध हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारू पिऊन टोळक्याचा धुडगूस

 

कल्याण पश्चिमेत गेल्या काही दिवसापासून दहशत निर्माण करण्यासाठी मारहाण व चाकूचा हल्ला करण्याचा प्रकार घडत असून आत नागरिकांना घरात राहणे ही मुश्कील झाले आहे. गुन्ह्याचा असाच एक प्रकार कल्याण पश्चिमेला घडला. फिर्यादी रुपेश सलफे हा त्याच्या आईसह घरात बसला होता. तेवढ्यात काही तरूण त्याच्या घराबाहेर आले आणि दारू पीत बसले. नशेत असलेल्या त्या तरूणांनी रुपेशला आईवरून शिवी दिली. याचा राग आल्याने रुपेश घराबाहेर आला आणि त्याने सिवी देणाऱ्या तरूणाला त्याबद्दल जाब विचारला.

मात्र या गोष्टीचा त्या तरूणाला , भाईला जबर राग आला आणि त्याने इतर साथीदारांसह मिळून रुपेशला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. एवढंच नव्हे तर चाकूने त्याच्यावर वारही केले. हा सगळा प्रकार पाहून रुपेशची आई, आपल्या मुलाला वाचवायला मधे पडली असता, त्या तरूणांनी तिच्या वयाचाही मान न राखता, त्या महिलेलाही बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत धमकीही दिली. नंतर ते टोळकं तिथून पसार झालं.

 

या घटनेत रुपेश जबर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. रवी बाळाराम पाटील उर्फ भु-या भाई, गणेश मारुती पाटील व विकी पाटील असे या आरोपींची नावे असून या आधीही त्यांच्याविरोधात दहशत माजवणे, मारहाण करणे, असे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समजते. पोलिस तिनही आरोपींचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -